
अमृतानुभव
अमृतानुभव कार्यक्रमात सद्गुरु ऋषितुल्य भावगंधर्व पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे तत्व महाराष्ट्रात रुजविले. ज्ञानेश्वर माऊलींच्या श्री भावार्थ दिपिका या ग्रंथास यंदा साडेसातशे वर्ष पूर्ण झाली आहेत.
या निमित्ताने 'अमृतानुभव' हा कार्यक्रम सादर केला जात आहे. प्रत्येक व्यक्ती गुरुच्या शोधात असतो, ज्यांना गुरु लाभतात ते भाग्यवान! मला प्रत्यक्ष पंडितजींकडून शिकण्याचे भाग्य लाभले, ज्यातून 'अमृतानुभव' कार्यक्रमाची निर्मिती झाली.
या कार्यक्रमात मी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना व ग्रंथराज 'अमृतानुभव' यांतील तत्व निरुपणासह सादर करणार आहे. शिवशक्ती समावेशनासारखा अवघड अद्वैत सिद्धांत यात मांडला आहे. हा कार्यक्रम सृजनशील श्रोत्यांसाठी आहे.
आपली उपस्थिती व आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. जरुर यावे ही नम्र विनंती.
कार्यक्रम स्थळ: विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक
दिनांक: सोमवार, ०३/०८/२६
वेळ: सायंकाळी ५ वाजता
प्रवेश: विनामूल्य
-- विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश)
Vidya Vikas Circle, Gangapur Road, Nashik, Maharashtra, India 422005
Get directionsScan med kameraet – begivenheden åbnes i Somo-appen.
